महाकुंभ मेळ्यासाठी पुणे ते प्रयागराज (उत्तर प्रदेश) दरम्यान विशेष रेल्वे सेवा सुरू करावी; दौंडचे आमदार राहुल कुल यांची केंद्रिय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचेकडे मागणी…

पुणे : कुंभमेळा हा भारतीय संस्कृती आणि धर्माचा एक अतिशय महत्त्वाचा धार्मिक उत्सव असून हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळ्यांपैकी एक आहे, १२ कुंभ मेळ्याचे चक्र पूर्ण झाल्यानंतर महाकुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते यंदा तब्बल १४४ वर्षांनी प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथे महाकुंभ मेळा पार पडत आहे या पवित्र कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देश विदेशातून लाखो भाविक प्रयागराज (उत्तर प्रदेश) येत आहेत.
सध्या पुणे आणि प्रयागराज (उत्तर प्रदेश) दरम्यान कोणतीही थेट रेल्वे सेवा नसल्याने भाविकांना महाकुंभ मेळाव्यासाठी प्रवास करताना अनेक वाहने बदलून प्रवास करावा लागतो, ज्यामुळे भाविकांना गैरसोय, विलंब आणि अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे.
पुणे परिसरातील भाविकांना महाकुंभ मेळ्यासाठी सहभागी होता यावे यासाठी पुणे ते प्रयागराज (उत्तर प्रदेश) दरम्यान विशेष रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.