Daund : मॉर्निंग वॉक करताना सामाजिक कार्यकर्त्याला दुचाकीची धडक, एकनाथ पवार यांचे निधन, दौंड तालुक्यातील घटना…

Daund : अपघाताच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. तसेच दौंड तालुक्यातील पाटस येथील सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मुकिंदा पवार (वय. ५२ ) यांचे अपघाती निधन झाले.
दौंड ते पाटस अष्टविनायक रस्त्यावर एकनाथ पवार सोमवारी (ता.१२) पहाटे सहा वाजण्याच्या आसपास पायी व्यायाम (मॉर्निंग वॉक) करीत असताना अज्ञात दुचाकीची धडक बसल्याने त्यांचा अपघात झाला. Daund
या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. एकनाथ पवार बहुजन चळवळीतील अग्रेसर कार्यकर्ते होते.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचे मोलाचं योगदान होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, भाऊ असा परिवार होता. त्यांच्या अपघाती निधनामुळे पाटस परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.