Cylinder Price : निवडणुकीच्या काळात सर्वसामान्यांना मोठा दिलासा, LPG सिलिंडरच्या दरात मोठी कपात, जाणून घ्या नवीन दर…

Cylinder Price : सध्या गॅस सिलिंडरच्या दरात कपात झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. एलपीजी सिलिंडर आजपासून १९ रुपयांनी स्वस्त झाला आहे. मात्र, हे बदल केवळ व्यावसायिक सिलिंडरच्या दरात झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे बाहेरचे पदार्थ स्वस्त होतील अशी अपेक्षा आहे.
सध्या सगळीकडे आपल्याला लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा एक सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. १९ किलोच्या सिलेंडरच्या किंमतीतील कपातीमुळे बाहेर खाणे आणि पिणे स्वस्त होईल अशी अपेक्षा आहे.

असे असताना मात्र घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 14.2 किलो एलपीजी सिलिंडरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीतील सामान्य ग्राहकांसाठी त्याची किंमत 803 रुपये आहे, तर उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी त्याची किंमत 603 रुपये आहे. यात देखील कपात करण्याची मागणी केली जात आहे.


दरम्यान, सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने जनतेला महागाईपासून दिलासा दिला आहे. तेल विपणन कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत कमी केली आहे. यामुळे निवडणूक झाल्यानंतर हे दर परत वाढण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. Cylinder Price
दरम्यान, दिल्लीत त्याची किंमत आता 1745.50 रुपये आहे. यापूर्वी ते 1764.50 रुपयांना उपलब्ध होते. अशा प्रकारे त्याची किंमत 19 रुपयांनी कमी झाली आहे. यापूर्वी 1 एप्रिल रोजी ते 30.50 रुपयांनी स्वस्त झाले होते. यामुळे हा देखील दिलासा मिळाला आहे.
आता 19 किलोचा सिलेंडर कोलकात्यात 1859 रुपये, मुंबईत 1698.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1911.00 रुपयांना मिळणार आहे. कमी झालेले दर आजपासून लागू झाले आहेत. यामध्ये बदल झाले आहेत.