Crime News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून शिक्षकाने दिली गर्भपाताची गोळी अन्…, धक्कादायक घटनेने उडाली खळबळ

Crime News : एका शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भपाताची गोळी दिल्याची धक्कादायक घटना उघडकी आली आहे. मुलीची प्रकृती बिघडल्याने त्याचं हे कृत्य उघडकीला आले आहे. Crime News
राजस्थानच्या शाहपुरा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर तेली (वय. २४) असे या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, सरकारी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाने सहा महिन्यांपूर्वी तिच्यावर बलात्कार केला होता. गेल्या ६ महिन्यांपासून आरोपी तिला अश्लील व्हिडीओ फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार करत होता.
या बलात्कारामुळे पीडिता गर्भवती राहिली आणि तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या, त्यामुळे तिला रक्तस्राव सुरू झाला. तिची प्रकृती बिघडल्याने, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला.
त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. हा प्रकार उघड झाल्यानंतर आरोपी शिक्षक फरार झाला आहे. सागर तेली असं या आरोपीचं नाव आहे. त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेण्यात येत आहे.