Crime News : लग्न झालं पण आठ दिवसांतच त्याने स्वतःच्या घरातील 8 जणांना कुऱ्हाडीने संपवल, शेवटी स्वतःलाही संपवल, घटनेने सगळेच हादरले….


Crime News : मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कुटुंबातील व्यक्तीने एक दोन नाहीतर तब्बल ८ जणांना कुऱ्हाडीने संपवलं. त्यानंतर आरोपीने स्वत: देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मध्य प्रदेशात कुटुंबातील तरूणाने 8 जणांवर कुऱ्हाडीने वार करत त्यांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच आरोपीचा नुकताच आठ दिवसांआधी विवाह झाला होता. त्यानंतर आरोपीने पत्नी, आई, बहिण, भाऊ त्याची तीन मुलं या सर्वांची हत्या केली.

सर्व पीडित झोपेत असताना मध्यरात्री आरोपीने त्यांची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:चं जीवन देखील संपवलं आहे. याप्रकरणामुळे आता मोठ्या प्रमाणात गावामध्ये पोलिसांचा फौजफाटा असल्याचं पाहायला मिळत आहे.

आरोपीचं नाव हे दिनेश पटेल (वय.२७) असे आहे.

दिनेश पटेलचे कुटुंबीयांनी आठवड्यापूर्वीच लग्न लावून दिले. २१ मे रोजी लग्न झाल्यानंतर त्याने गुरुवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास नवविवाहित पत्नी वर्षा, मोठा भाऊ श्रावण, त्याची पत्नी, आई सियाबाई, लहान बहीण आणि श्रावणच्या तीन मुलांना कुऱ्हाडीने वार करून संपवले. Crime News

घराच्या अंगणात झोपलेल्या या सर्वांनाच त्यांनी मारून टाकल्याने संपूर्ण गावात दहशतीचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान आठ जणांना मारल्यानंतर तो बहिणीच्या नातवावरही हल्ला करत होता, परंतु नातवाने पळ काढून जीव वाचवला, मात्र त्यात तो किरकोळ जखमी झाला.

दरम्यान बहिणीने आरडाओरडा केल्याने दिनेश पटेल तिथून पळाला आणि काही अंतरावर त्याने पुन्हा गळफास घेऊन स्वतःचेही जीवन संपवले. न या घटनेनंतर सकाळपासून माहुल झिर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस घटनास्थळी पोचले असून संपूर्ण गावात संचारबंदी करण्यात आली आहे. दिनेश पटेल हा मानसिक दृष्ट्या आजारी होता. त्याच्यावर उपचार सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!