Crime News : एकदाच नशेच्या ८ गोळ्या खाऊन गांजा पिऊन काढला मित्राचा काटा, धक्कादायक माहिती आली समोर….


Crime News : दिवसागणिक राज्यातील गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या राज्यात वेगात वाढले आहेत.

सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाचवेळी नशेच्या आठ गोळ्या खाऊन आणि गांजा पिऊन मित्राचा खून केल्याची घटना विश्रांतीनगर भागात बुधवारी (ता.१६) सकाळी ११ वाजता घडली आहे.

अमोल उर्फ नंदू संतोष दाभाडे (वय. २१, रा. विश्रांतीनगर), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर नीलेश सुभाष चव्हाण (वय. १९, रा. रेल्वे पटरीजवळ, शिवशाहीनगर), असे आरोपी तरुणाचे नाव आहे. Crime News 

तसेच घटना घडल्यानंतर इतर तरुणांनी जागेवरच आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र, चाकूचा धाक दाखवून तो पळून गेला. चाकू हल्ल्याच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक कुंदन जाधव यांनी उपनिरीक्षक रेशीम कोळेकर, सहायक उपनिरीक्षक सुनील म्हस्के, अंमलदार विजय लकवाल, दीपक जाधव यांच्या पथकाला घटनास्थळी रवाना केल.

दरम्यान, त्यानंतर पुंडलिकनगर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. तो रेकॉर्डवरील आरोपी आहे. शहरात टवाळखोरांची भाईगिरी वाढल्याचे दिसत आहे. एकूणच शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!