क्रेनची जोरदार धडक ; कर्तव्यावर असताना काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू, मुंबईतील घटना

मुंबई : भरधाव हायड्रा वाहनाने कर्तव्यावर असलेल्या ट्रॅफिक विभागातील कर्मचाऱ्याला चिरडलं असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश पाटील असं अपघातात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. एका हायड्रा वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. टायर अंगावरून गेल्यामुळे हा कर्मचारी गंभीर जखमी झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान या दुर्घटनेची चौकशी सुरू असून संबंधित वाहनचालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. सध्या पोलिस अपघाताचा तपास करत आहे. या अपघातामध्ये घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

Views:
[jp_post_view]