Covid-19 : महाराष्ट्रात पुन्हा पाय पसरतोय कोरोना, पुणेकरांसाठी धोक्याची घंटा, नेमकं काय घडलं?


Covid-19 : जगभरात हाहाकार माजवणारा कोरोना विषाणू अजूनही सक्रिय असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात सोमवारी कोविड-१९ चे सहा नवीन रुग्ण आढळले, ज्यामध्ये मुंबई आणि पुणे शहरांमध्ये प्रत्येकी तीन आहेत असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

तसेच महाराष्ट्रात कोविड-१९ सब व्हेरियंटचे ९१ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. हे Covid-19 Omicron चे सब-व्हेरियंट KP.2 आहे. अनेक देशांमध्ये याची प्रकरणे समोर येत आहेत. या प्रकाराचा पहिला व्हेरियंट जानेवारीत उघडकीस आला होता.

ताज्या आकडेवारीनुसार, पुण्यात ५१ आणि ठाणे, महाराष्ट्रामध्ये २० केस दाखल झाल्या आहेत. KP.2 चे पहिला रुग्ण हा महाराष्ट्रात जानेवारी महिन्यात सापडला होता. यामुळे एकच हाहाकार सुरु होता. Covid-19

दरम्यान, अशातच आता ठाणे वगळता अमरावती आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी सात, तर सोलापूरमध्ये दोन, अहमदनगर, नाशिक, लातूर आणि सांगलीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडले आहेत. यामुळे आता पुन्हा एकदा सर्वांचं टेन्शन वाढलं आहे. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!