आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले! मुंबईत कोरोना वाढला, मास्क वापरण्याचा दिला सल्ला…

मुंबई : देशात कोरोनाने पुन्हा सुरुवात केल्याचे दिसत आहे. केरळमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट आढल्यानंतर कोरोनान पुन्हा पाय पसरण्यास सुरवात केल्याचे दिसत आहे. केरळ पाठोपाठ कर्नाटक मध्येही कोरोनाचे रुग्ण आढळले. आता या कोरोनाचा धोका महाराष्ट्रापर्यंत पोहोचला आहे. छत्रपती संभाजी नगर मध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. तर, मुंबईतही नागरिकांना मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, समजा नागरिकांना सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे असतील तर त्यांनी तातडीने तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्यात आता टास्क फोर्सची स्थापना केली जाणार आहे. देशात कोरोना रुग्णाची संख्या २,६६९ इतकी झाली आहे. अशातच आता छत्रपती संभाजीनगरात कोरोनाचे २ रुग्ण सापडले आहे.
त्यातही जे-१ या नव्या व्हेरियंटचा रुग्ण कोकणात आढल्याने काहीशी चिंता वाढली आहे. मुंबई शहरात मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आहे. शिवाय आपत्ती व्यवस्थापन प्रक्रियेला प्रशासन चालना दिली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणा आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली.