Congress : काँग्रेसमध्ये पुन्हा राजकीय भूकंप? बड्या नेत्याच्या मुलाने बदललं सोशल मीडियावरील प्रोफाईल, भाजपमध्ये करणार प्रवेश?


Congress : काँग्रेसला धक्क्यांवर धक्के बसताना दिसत आहेत. नुकतेच काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांनी पक्ष सोडला आहे. त्यातच काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसलण्याची दाट शक्यता आहे.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पार्टीचे नेता कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांनी काँग्रेस पार्टीचे नाव आपल्या एक्स प्रोफाईलवरुन काढून टाकले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

कमलनाथ आणि त्यांचे खासदार पुत्र हे छिंदवाडाच्या पाच दिवसांचा दौरा करणार होते. पण, त्यांनी तो रद्द करुन अचानक दिल्लीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज दोघे दिल्ली दौऱ्यावर आहेत. कमलनाथ आणि नकुलनाथ काँग्रेस सोडतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. Congress

त्यांच्यासोबत १० ते १२ आमदार असल्याचंही सांगितलं जातं. मात्र, याबाबत अधिकृत कोणतीही माहिती नाही. त्यांनी पक्ष सोडला तरी कोणत्या पक्षात प्रवेश करतील याबाबत प्रश्न कायम आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुंबईतील काँग्रेसचे मोठे नेते मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का आहे. या दोन्ही नेत्यांना राज्यसभेची संधी मिळाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!