Congress : राजकारणात पुन्हा एकदा होणार धमाका! काँग्रेसचे आमदार पक्ष सोडणार, महत्वाची माहिती आली समोर…


Congress : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.

याचपार्शभूमीवर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांनी आपली भूमिका बदलण्यास सुरुवात केली आहे. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा फटका बसणार असल्याचा अंदाज आहे.

राज्यातील काँग्रेसचे दोन आमदार लवकरच शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतीच या दोन्ही आमदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी भेट झाली.

काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मंगळवारी रात्री या दोन्ही आमदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या बैठकीनंतर हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. Congress

हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंगपूर्वी पक्ष सोडणार असल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर हिरामण खोसकर यांनी आता माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

मी काँग्रेससोबत होतो आणि काँग्रेससोबतच राहणार असल्याचे ते म्हणाले. मला उमेदवारी मिळेल. परिसराच्या विकासाच्या मुद्द्यावर मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. असं ते म्हणाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!