लाडक्या बहिण योजनेवर टिका करणारी काँग्रेस महिलांना देणार दोन हजार रुपये ; विधानसभेसाठी कॉग्रेस करणार स्वतंत्र जाहीरनामा ….

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आज (सोमवार) जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. कर्नाटक, तेलंगणाप्रमाणेच काँग्रेसच्या या जाहिरनाम्यात सगळ्याच घटकांसाठी मोठी आश्वासने असणार आहेत.
या महिला, शेतकऱ्यांपासून बेरोजगार तरुणांसाठीच्या योजनांचा समावेश आहे. काँग्रेसचा जाहीरनामा स्वतंत्र असणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा जाहीरनामा स्वतंत्रपणे जाहीर होण्याची शक्यता आहे.
महायुतीला कडवी टक्कर देण्यासाठी व शेतकरी आणि महिलांना लक्षात घेऊन हा जाहीरनामा तयार केला आहे. शेतकऱ्यांसाठी तीन लाखांपर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. तर महिलांना 2 हजार रुपयांपर्यंत खात्यावर पैसे देण्याबाबात चर्चा सुरू आहे. राजधानी दिल्ली इथं काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर चर्चा सुरू आहे.
Views:
[jp_post_view]