मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमधील राडा प्रकरणी दोन मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात…!

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. छत्रपती संभाजी नगर येथे राम मंदिरासमोर उभी असलेली वाहने काही आज्ञातांनी पेटवून दिली होती.यामुळे आजूबाजूच्या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे.
दरम्यान ही घटना येथील किराडपुरा भागात रात्री एक दीडच्या सुमारास घडली होती. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन दिवसापूर्वी जवळपास ४०० ते ५०० जणांवर गुन्हा दाखल केला होता. आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी आत्तापर्यंत 10 लोकांना अटक केली आहे. महत्वाचं म्हणजे यातील दोन संशयीत मुख्य आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन मुख्य आरोपींनी पोलिसांच्या गाड्या पेटवून देत दगफेक केल्याची माहिती समोर आली आहे.