Chandrakant Patil : अखेर चंद्रकांत पाटलांनी शब्द पाळला!! २७ तारखेला निघणार जीआर, मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण…

Chandrakant Patil : राज्यातील विद्यार्थिनींना आता मोफत उच्च शिक्षण मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा जीआर २७ तारखेपासून काढला जाणार आहे. याबाबत माहिती उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून मुलींना मोफत उच्च शिक्षण दिले जाईल असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं. मात्र शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरीदेखील मुलींना मोफत शिक्षणाचा लाभ मिळाला नाही.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे याचा जीआर निघाला नव्हता मात्र आता हा जीआर २७ तारखेपासून काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. Chandrakant Patil
दरम्यान, या वर्षाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थिनींना मोफत उच्च शिक्षण दिलं जाईल, असं आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं. महाराष्ट्र राज्यात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून मुलींना बारावीनंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी मोफत शिक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली होती.
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ९ फेब्रुवारी २०२४ रोजी जळगावमध्ये ही घोषणा केली होती. जून महिन्याच्या ८ तारखेपासून मोफत शिक्षणाची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते. परंतु शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरही मुलींना मोफत शिक्षणचा लाभ मिळाला नाही.