पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक संजय घुले यांच्यावर गुन्हा दाखल…!


पुणे : पुण्यातील महंमदवाडी परिसरातील भाजपाचे माजी नगरसेवक संजय घुले यांच्यासह तिघांवर कोंढवा पोलिस ठाण्यात फसवणूक, अपहार, धमकावल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणी फिर्यादी मधुरा रामदास गायकवाड (42, रा. महमंदवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय घुले, अनिकेत घुले (28, दोघेही रा. न्याती चौक, महमंदवाडी) आणि गणेश चौंधे (52) याच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक संजय घुले यांच्या मालकीचे महमंदवाडी येथील सर्व्हे नंबर 7 मध्ये प्लॉटींग आहे. त्या प्लॉटींगमधील अडीच गुंठे जागा 55 लाख रूपयांना फिर्यादी मधुरा गायकवाड यांना विकायची ठरलेले होते. त्यासाठी बुकींग स्वरूपात फिर्यादी यांच्याकडून 12 लाख घेण्यात आले. त्यानंतर फिर्यादी यांनी खरेदीखताबाबत विचारणा केली असता ती मिळकत त्यांनी तिसर्‍याला विकल्याचे समजले. याबाबत फिर्यादींना शिवीगाळ करून जीवे मारण्याचीही धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान , संबंधित प्रकार 26 ऑगस्ट 2019 ते जुलै 2022 यादरम्यान घडला आहे. यासाठी फिर्यादी यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!