Captain Vijayakanth : करोनाशी झुंज ठरली अपयशी, अभिनेते आणि डीएमडीकेचे प्रमुख विजयकांत यांचे निधन, ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…


Captain Vijayakanth : अभिनेते आणि तामिळनाडूमधील मोठे राजकीय व्यक्तीमत्व कॅप्टन विजयकांत यांचे निधन झाले. कोरोनामुळे त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. चेन्नईमध्ये त्यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

डीएमडीकेचे संस्थापक कॅप्टन विजयकांत यांच्या निधनानंतर सिनेविश्व आणि राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जातो आहे. सध्या सोशल मीडियावर पोस्ट करत विजयकांत यांचे चाहते, सेलिब्रिटी आणि पक्षाचे कार्यकर्ते श्रद्धांजली वाहत आहेत.

तामिळनाडू विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते विजयकांत यांना मंगळवारी श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर रुग्णालयात डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली उपचार सुरू होते.

पण प्रकृती आणखी बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पण आज उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे सर्वांना मोठा धक्का बसला. Captain Vijayakanth

विजयकांत हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता होते. त्यांचा फिल्म इंडस्ट्रीतला प्रवास खूपच चांगला राहिला आहे. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी साऊथ फिल्म इंडस्ट्रीला १५४ चित्रपट दिले आहेत.

फिल्मी प्रवासानंतर त्यांनी राजाकारणात एन्ट्री घेतली. त्यांनी डीएमडीके पक्षाची स्थापना केली. विरुधाचलम आणि ऋषिवंदियम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत ते दोन वेळा विधानसभेचे सदस्य राहिले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!