कॅप्टन कूल धोनी रंगवतोय स्टेडियममध्ये खुर्च्या…!

चेन्नई : इंडियन प्रीमियर लीग २०२३ ची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. चेन्नई सुपर किंग्ज चा कर्णधार महेंद्रसिंग धोनी नेटमध्ये फलंदाजी करत प्रचंड घाम गाळत आहे. दरम्यान कॅप्टन कूलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यात तो चेपॉक स्टेडियम वर तो जर्सीच्या रंगात खुर्ची रंगवताना दिसत आहे. चेन्नई सुपरकिंग्जच्या जर्सीचा रंग सुरुवातीपासूनच पिवळा आहे.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलद्वारे शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, धोनी स्टँडमधील खुर्चीवर पेंट स्प्रे करताना दिसत आहे.
आयपीएल २०२३ सुरू होण्यापूर्वी स्टँडच्या देखभालीचे काम सुरू आहे. धोनीच्या नेतृत्वाखालील संघ ३१ मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गतविजेत्या गुजरात जायंट्सविरुद्ध आपली मोहीम सुरुवात करेल.
Views:
[jp_post_view]