ब्रेकिंग! माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न? रुग्णालयात दाखल..

पुणे : पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. उषा काकडे असं त्यांचं नाव आहे. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आता सध्या उषा काकडे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. उषा यांनी झोपेच्या गोळ्या जास्त प्रमाणात घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
याबाबत खरे कारण समोर आले नसले तरी कौटुंबिक कारणातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. रुबी हॉस्पिटलने अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती दिली आहे.
रुबीहॉल हॉस्पिटलचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी याबाबत माहिती दिली. याबाबत पुणे शहरात चर्चा सुरू झाली आहे. घटनेची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. याबाबत अजून कुटूंबाकडून माहिती दिली गेली नाही.