ब्रेकिंग! eKYC केली पण खात्यात 1500 नाहीच ; लाडक्या बहिणींचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, लिंक पुन्हा सुरु होणार?


पुणे : मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेची ई केवायसी करूनही,अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. यामुळे महिलांनी आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहलं आहे. या पत्रात महिलांनी ई-केवायसीची लिंक पुन्हा सुरू करावी, अशी मागणी थेट शासनाकडे केली आहे. आता या लाडक्या बहिणीसाठी सरकार काय ऍकशन घेणार हॆ पाहणे महत्वाचे ठरणार आहे

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत हप्ता न मिळालेल्या महिला यवतमाळ येथील महिला व बालकल्याण विभागात धडक देत आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी उपस्थित अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांवर संताप व्यक्त करित आमच्या केवायसी प्रक्रिया पूर्ण करून लाभ मिळवून द्या अन्यथा सर्वांचा लाभ बंद करण्याची मागणी केली. ई केवायसी करूनही लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे न आल्याने लाडक्या बहिणी आक्रमक झाल्या आहेत.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील बोगसगिरी थांबवण्यासाठी या योजनेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली होती. त्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत 60 टक्क्याहून अधिक पात्र महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली. तर काही महिलांनी केवायसीकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. दोन दिवसांपूर्वीच शासनाने डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित केला. परंतु शेकडो महिलांना लाभ खात्यात जमा झालाच नाही. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं.

महिलांनी आक्रमक होऊन केलेल्या प्रकारामुळे महिला व बालकल्याण विभागाच्या डोकेदुखीत प्रचंड वाढ झाली आहे. शेवटी महिला व बालकल्याण विभागाने केवायसीची लिंक पुन्हा चालू करावी, असे पत्र पाठविले आहे. या पत्रावर शासन कधी आणि नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!