भाजप आमदार महेश लांडगे यांची आमदारकी अडचणीत? महत्वाची माहिती आली समोर..

पिंपरी चिंचवड : भाजपचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे सध्या अडचणीत आले आहेत. याचे कारण म्हणजे भोसरी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून निवडणूक प्रक्रिया कायद्यानुसार झाली नाही असा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयाने 15 एप्रिल पर्यंत आमदार महेश लांडगे यांना उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे आमदार लांडगे यांची आमदारकी धोक्यात येणार का अशी चर्चा रंगली आहे. यामुळे लवकरच याबाबत माहिती समोर येणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अजित गव्हाणे यांनी आमदार लांडगे यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.
दोघांमध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये लढत झाली. या लढतीमध्ये आमदार महेश लांडगे यांनी 62 हजार बोगस मतदारांचा समावेश केला असून 15 हजार मतदारांचे नावे वगळण्यात आली असल्याचा आरोप करत गव्हाणे यांनी याचिका दाखल केली होती.
आमदार लांडगे यांनी प्रशासनाला हाताशी धरून नियोजनबद्ध भ्रष्टाचार केल्याचे पुरावे असल्याचे या याचिकेत गव्हाणे यांनी म्हटले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या याचिकेची दखल न्यायालयाने घेतली असून न्यायाधीश आर.आय. छागला यांनी दिनांक 21 मार्च 2025 रोजी प्राथमिक सुनावणी झाली.
या सुनावणीनंतर आमदार लांडगे यांना 15 एप्रिल पर्यंत याचिकेतील आरोपांना उत्तर देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे आमदार महेश लांडगे सध्या अडचणीत आले असल्याचे सांगितले जात आहे. आता येणाऱ्या काळात काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.