भाजप देशाचा पैसा लुटणाऱ्यांच्या मदतीला उतरला आहे का? : प्रियंका गाँधी

राहुल गांधींची खासदारकी रद्द होताच प्रियांका गांधींचं संतापजनक ट्विट...


नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.यामुळे राहुल गांधी यांना मोठा धक्का बसल्याचे समजले जात आहे.राहुल गांधी यांच्याविरुद्ध झालेल्या या कारवाईनंतर त्याचे पडसाद राज्याच्या विधानसभेत दिसून आले आहेत.

दरम्यान ,सुरत कोर्टाने राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात दोषी ठरवले असून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर त्यांना जामीन देखील मंजूर झाला. मात्र दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. आता यांनतर प्रियांका गांधी यांनी ट्विट करत यावर आपल्या प्रतिक्रिया ट्विट करत व्यक्त केली आहे.

प्रियांका गांधी यांनी ट्विटद्वारे थेट भाजपवर निशाणा :

नीरव मोदी घोटाळा – 14,000 कोटी

ललित मोदी घोटाळा – 425 कोटी

मेहुल चोक्सी घोटाळा – 13,500 कोटी

देशाचा पैसा लुटणाऱ्यांच्या मदतीला भाजप का उतरला आहे? ते चौकशीपासून का पळत आहे? यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात. भाजप भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालते का? असा सवाल प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!