मोठा धक्का! एलपीजी सिलिंडरच्या किमतीत पुन्हा वाढ, आजपासून नवीन दर…


मुंबई : सामान्य नागरिकांना आजपासून मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण देशभरात व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल आणि आसामसह काही राज्यांतील निवडणुका संपल्यानंतर ही दरवाढ झाल्याची चर्चा आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी 1 मे 2026 पासून 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किमतीत तब्बल 993 रुपयांनी वाढ केली आहे. या वाढीनंतर कमर्शियल सिलिंडरची किंमत सुमारे 3 हजार रुपयांच्या पुढे गेली आहे.

1 एप्रिलपर्यंत हा सिलिंडर सुमारे 2078 रुपयांना मिळत होता, मात्र आता वाढीनंतर त्याची किंमत 3071 रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, व्यावसायिक सिलिंडरच्या दरवाढीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि खानावळींच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पदार्थांच्या किमती वाढू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!