मोठी बातमी! वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली! लावले ऑक्सिजन, धक्कादायक माहिती आली समोर..


बीड : काही दिवसांपूर्वी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सीआयडी तपासाला प्रचंड वेग आला आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा आज स्वत:हून पुण्याच्या सीआयडी कार्यालयात सरेंडर झाला.

यानंतर नियमानुसार आरोपी वाल्मिक कराड याचं मेडिकल करण्यात आलं. त्यानंतर त्याला तातडीने बीडच्या केज कोर्टात काल रात्री उशिरा हजर करण्यात आले आहे. त्यानंतर केजमधील कोर्टाने कराडला १५ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. थाटात जगत असलेल्या वाल्मिक कराडची तुरुंगातील पहिली रात्र फारशी चांगली राहिली नसल्याचे समोर आले आहे.

रात्री दीड वाजता केज न्यायालयातून बीड शहर पोलीस ठाण्यात त्याला आणण्यात आले होते. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला काही वेळ ऑक्सिजन लावावे लागले. सीआयडीच्या कोठडीत रात्री त्याची शुगर वाढली. त्यामुळे त्याला डॉक्टरांनी ऑक्सिजन लावले.

वाल्मिक कराड यांनी रात्रीपासून जेवण घेतले नाही. सकाळी नाश्ताही केला नाही. वाल्मिक कराडला मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास आहे. रात्री कराड हा ऑक्सिजन लावून झोपले होते, अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.

रात्री उशिरा तुरुंगात गेल्याने वाल्मिक कराड हा सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास उठले. सकाळी आवरल्यानंतर त्यांनी चहा, नाश्तादेखील घेतला नाही. वाल्मिक कराडला मधुमेहचा त्रास आहे. त्यामुळे कराडला आग्रह केल्यानंतर त्यांनी सकाळी ११.३० वाजता सरकारी जेवण घेतले. त्यावेळी त्याने अर्धी चपाती खाल्ली.

सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास भात किंवा खिचडी देण्याची मागणी त्याने केली असल्याचे समजते. याबाबत त्याची कसून चौकशी केली जात आहे. यामुळे आता त्याला जामीन मिळणार की कारवाई होणार हे लवकरच समजेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!