मोठी बातमी! गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचा मोठा निर्णय, विसर्जनादिवशी सलग 41 तास सेवा सुरू. …

पुणे : पुण्यातील गणेशोत्सवाची मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक कानाकोपऱ्यातून येत असतात. आज अनंत चतुर्थीच्या दिवशी पुणे मेट्रोने भाविकांसाठी मोठा निर्णय घेत गणरायाच्या विसर्जनाच्या दिवशी सलग 41 तास सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पुण्यातील गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. मानाचे गणपती आणि विविध प्रकारचे देखावे पाहण्यासाठी राज्य आणि राज्याबाहेरील लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहे. पुणे मेट्रोने भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन, त्यांच्या सोईसाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशने गणेशोत्सवाच्या काळामध्ये पहाटे दोनपर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच विसर्जनाच्या दिवशी सलग 41 तास मेट्रो सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे भाविकांना देखावे पाहण्यासाठी आणि रात्री उशीरा प्रवासासाठीची सोय होणार आहे.गणेशोत्सवात येणाऱ्या नागरिकांसाठी महामेट्रोने रात्री उशिरापर्यंत सेवा देण्याचे नियोजन केले आहे. यावर्षी गणेशोत्सवावेळी पहिल्यांदाच जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मार्गावरील मेट्रो सुरू असणार आहे. या मार्गावरील कसबा, मंडई, स्वारगेट ही मेट्रो स्थानके सुरू झाली आहे. ही मेट्रो स्थानकं थेट मानाच्या गणपतीच्या जवळपास आहे. शिवाय, मध्यवर्ती भागात गर्दी जास्त होते, त्यामुळे प्रवाशांना गर्दी टाळून मेट्रोने गणेशोत्सव पाहण्यासाठी जाता येणार आहे. या काळात रात्री उशिरापर्यंत देखावे, गणपती पाहण्यासाठी येतात. त्यामुळे पहाटे दोनपर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे मेट्रोच्या फेऱ्या वाढणार आहेत.
आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी दि. 06 रोजी सकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी रात्री 11 पर्यंत मेट्रो सेवा 41 तास अखंड सुरू राहणार आहे. तर, दि. 27 ते 29 ऑगस्ट या गणेशेत्सवाच्या पहिल्या तीन दिवसांत मेट्रो सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत सुरू राहील, तर दि. 30 ऑगस्ट ते दि. 5 सप्टेंबर या काळात मेट्रोसेवा सकाळी 6 ते रात्री 2 पर्यंत सुरू राहणार आहे.
