मोठी बातमी! स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठा स्फोट, ८ जणांचा मृत्यू, घटनेने भंडाऱ्यात खळबळ…

भंडारा : येथील जवाहरनगरच्या दारुगोळा निर्मिती कारखान्यात मोठा स्फोट झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आयुध निर्माण कारखान्यात हा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटादरम्यान मोठा आवाज झाला. हैराण करणारे म्हणजे या स्फोटात जीवितहानी देखील झाली. ८ लोकांचा मृत्यू यामध्ये झाला आहे.
या स्फोटानंतरचे काही फोटो आणि व्हिडीओ पुढे आले आहेत. ज्या इमारतीमध्ये हा स्फोट झालाय, ती इमारत पूर्णपणे उद्धवस्थ झाली आहे. सध्या दारुगोळा निर्मिती कारखान्यातचे मोठे अधिकारी, पोलिस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी हे घटनास्थळी पोहोचले आहेत.
त्यांनी मदतकार्य देखील सुरू केल्याची माहिती आहे. यामध्ये अनेकजण जखमी झाले असल्याचे सांगितले जात आहे. ऑर्डनन्स फॅक्टरीकडून किंवा अधिकाऱ्यांकडून या स्फोटात किती जणांचा मृत्यू झाला हे सांगण्यात नाही आले. विजय वडेट्टीवार यांनी याबाबत माहिती दिली. स्फोट झालेल्या इमारतीमधील इतर कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.
सध्या बचावकार्य सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्फोटाच्या घटनेत दुर्दैवाने कामगारांचा मृत्यू झाला असून इतर जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. बचाव कार्यासाठी एसडीआरएफ आणि नागपूर महापालिकेची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.
तसेच संरक्षण दलाने मदत कार्यात सहभागी होण्यास सुरुवात केली आहे. स्फोट कशामुळे झाला हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण स्फोटकं बनवणारी कंपनी असलेल्या या फॅक्टरीमध्ये साबुदाणा प्रमाणक कच्चा माल जो आरडीएक्स तयार करण्यासाठी वापरला जातो. याबाबत तपास सुरू आहे.
या दुर्घटनेमुळे शोककळा पसरली असून, मृतक कामगाराच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त करण्यात आला आहे.घटनास्थळी पोलिस, अग्निशमन दल आणि कंपनीचे वरिष्ठ अधिकारी मदत कार्यरत आहेत. याबाबत कर्मचारी तपास करत आहेत.