धक्कादायक! फोन न केल्याचा संताप; पतीचा विकोप, पत्नीच्या डोक्यात दगड घालून…


धुळे : पती-पत्नीचं नातं प्रेम आणि विश्वासावर उभं असतं. मात्र, कधी कधी किरकोळ कारणांवरूनही वाद विकोपाला जातात. अशीच एक धक्कादायक घटना धुळ्यात घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे.

बाहेरगावी असताना पत्नीने फोन केला नाही, या क्षुल्लक कारणावरून पती संतापला. घरी परतल्यानंतर त्याने पत्नीवर दगडाने हल्ला करत तिचं डोकं फोडलं. या भीषण हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात खैरखुटी येथील शेकड्या पाडा भागात 19 एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ही भीषण घटना घडली. कामानिमित्त चार दिवस बाहेर असताना पत्नीने साधी विचारपूसही केली नाही, या कारणावरून पतीचा संताप अनावर झाला.

घरी परतल्यानंतर त्याने पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. ललिता सुनील पावरा (वय 25) असे मृत महिलेचे नाव असून आरोपी पती सुनील सायमल पावरा (वय 30) याला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी पती सुनील पावरा याला ताब्यात घेतले. या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, अलीकडच्या काळात कौटुंबिक कलह, अनैतिक संबंधांचा संशय, अचानक उद्भवणारा राग आणि इतर किरकोळ कारणांमुळे वाद विकोपाला जाण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. खान्देशात गेल्या वर्षभरात अशा प्रकारांमध्ये सुमारे 62 महिलांनी आपला जीव गमावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!