मोठी बातमी! भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला! राज्यात खळबळ, नेता गंभीर जखमी….


मुंबई : सध्या एक धक्कादायक घटना राजकारणातून समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते हेंमत परांजपे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दोन व्यक्तींनी हेंमत परांजपे यांना मारहाण केली.

त्यांना दगडाने देखील मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे याबाबत नेमकं कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे बोलले जात आहे. याबाबत पोलीस प्रशासन जागे झाले असून तपासाची सूत्रे फिरवली आहेत.

दरम्यान, या हल्ल्यानंतर आता शहरातील भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले बघायला मिळत आहे. आरोपींना लवकरच अटक करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांमध्ये अलीकडे मोठी वाढ झाली आहे.

यावेळी दहशत पसरविण्याचा सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला असून माहिती घेतली जात आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कुटूंबातील सदस्य आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्या आधारे पोलीस तपास करत आहेत. यामध्ये मारहाणीचे दृश्य स्पष्ठ दिसत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असेही सांगितले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!