मोठी बातमी! लक्ष्मण हाकेंकडून अजित पवारांना शिवीगाळ, पोलिसांनी घेतलं ताब्यात, म्हणाले, अजित पवार हरामखोर….

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर लक्ष्मण हाके सतत टीका करत आहेत. असे असताना आज मुंबईमधील आंदोलनाच्या दरम्यान लक्ष्मण हाकेकडून अजित पवारांना शिवीगाळ करण्यात आली. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
आज लक्ष्मण हाके यांचं गिरगाव चौपाटीवर आंदोलन सुरू होतं. महाज्योतीला निधी मिळत नसल्याचा आरोप हाकेंकडून करण्यात आला तर पोलिसांनी लक्ष्मण हाकेंना सध्या ताब्यात घेतलं आहे. याठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला. आता राष्ट्रवादी विरुद्ध लक्ष्मण हाके असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
याबाबत माहिती अशी की, महाज्योतीला निधी मिळत नसल्याने काही विद्यार्थ्यांसह लक्ष्मण हाके खोल पाण्यात गेले आणि त्यांनी आंदोलन केलं. याठिकाणी पोलीस देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. गिरगाव चौपाटीवर हाके यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
यावेळी कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी वेळीच हाकेंना ताब्यात घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका करताना हाकेंनी पातळी सोडली असल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी थेट अजित पवार यांनाच शिवीगाळ केली. यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सध्या राज्यभरात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वातावरण आधीच तापलेले असताना लक्ष्मण हाके यांनी सरकारच्या धोरणांवर निशाणा साधत सरकारवर घणाघात केला. यामुळे आता येणाऱ्या काळात नेमकं काय घडणार हे लवकरच समजेल.