ATM मधून पैसे काढणाऱ्यांसाठी मोठी बातमी! एटीएममधून कॅश काढणं महागणार, इतके मोजावे लागणार पैसे, जाणून घ्या..


पुणे : जर तुम्ही नियमितपणे ATM मधून पैसे काढत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. १ मे २०२५ पासून ATM मधून पैसे काढण्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. रिझर्व्ह बँकेने ATM इंटरचेंज शुल्क वाढवल्यामुळे, मोफत मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

ATMमधून पैसे काढताना ग्राहक सध्या मेट्रो शहरांमध्ये महिन्याला ५ आणि गैर-मेट्रो शहरांमध्ये 3 मोफत व्यवहार करू शकतात. मात्र या मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार झाल्यास, त्यासाठी अधिक शुल्क आकारले जाणार आहे.

नवीन नियमानुसार, आर्थिक व्यवहारांसाठी आधी १७ रुपये शुल्क होते, ते आता १९ रुपये करण्यात आले आहे. तसंच शिल्लक चौकशी साठीचे शुल्कही ६ रुपयांवरून वाढवून ७ रुपये करण्यात आले आहे.

ग्राहकांनी जर एखाद्या इतर बँकेच्या ATMमधून पैसे काढले आणि मोफत व्यवहारांची संख्या ओलांडली, तर प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी हे वाढीव शुल्क लागू होणार आहे. त्यामुळे ATMमधून नियमितपणे पैसे काढणाऱ्या व्यक्तींना आता आपली व्यवहार योजना नव्याने आखावी लागेल.

दरम्यान, ही शुल्कवाढ व्हाइट-लेबल ATM ऑपरेटरच्या मागणीमुळे करण्यात आली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, ATM मेंटेनन्स आणि ऑपरेशनचा खर्च वाढला असून, तो भागवण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारणे आवश्यक आहे. RBIने त्यांच्या या मागणीला मान्यता दिली आहे, आणि आता बँकांना हे शुल्क ग्राहकांकडून वसूल करण्यास परवानगी मिळाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!