मोठी बातमी! संपदा मुंडें आत्महत्या प्रकरणात वडिलांचा धक्कादायक खुलासा ; मुंडेंनी आधीच दिलेली आत्महत्येची कल्पना…

सातारा: साताऱ्यातील फलटण शहरात एका महिला डॉक्टरने हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आपल आयुष्य संपवलं असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.आता याप्रकरणी अनेक खुलासे समोर येत आहेत. या आत्महत्ये प्रकरणी तिच्या वडिलांनी गंभीर आरोप केला आहे. माझ्या मुलीला वारंवार पोस्टमोर्टम रिपोर्ट बदलून द्या, असे सांगितले जायचे. मला जर त्रास झाला तर आत्महत्या करेन, असे ती वारंवार सांगायची, असे तिचे वडील म्हणाले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला आणखीन वेगळ वळण लागणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संपदा मुंडे यांच्या वडिलांची प्रतिक्रिया काय?

माझी मुलगी डॉ. संपदा मुंडे हिने काल काहीही न सांगता अचानक आत्महत्या केली. आम्हाला काहीही न सांगता तिने ड्युटी संपल्यानंतर हॉटेलमध्ये जाऊन आत्महत्या केली. ती आम्हाला अधूनमधून सांगायची की मला पोस्टमोर्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वैगरे असा अधिकाऱ्यांचा त्रास होतो. मला जर तसा त्रास झाला तर मी आत्महत्या करेन, असे ती अधूनमधून सांगायची. आत्मतीचे आधीच कल्पना दिली असल्याचा धक्कादायक खुलासा त्यांच्या वडिलांनी केला आहे

डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती.. PSI गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर हे दोन पोलीस अधिकारी माझ्या मृत्यूला जबाबदार असल्याचे तिने सुसाईड नोटमध्ये नमूद केले होते. आता याप्रकरणी मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी याप्रकरणी जबाबदार असलेल्या संबंधित पोलिसांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत
