मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून अतिवृष्टी बाधितांसाठी पॅकेज जाहीर,..


पुणे : राज्यात पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे, पावसाचा प्रचंड मोठा तडाखा शेतकऱ्यांना बसला आहे, या सर्व पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली, यामध्ये,शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. या पॅकेजमधून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत, सरकारने अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 18500 रुपयांची मदत मिळणार आहे, तर हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 27 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. बागायती शेतीला 32500 रुपयांची मदत केली जाणार आहे.

अतिवृष्टीमुळे ६८ लाख ६९ हजार हेक्टर पिकांचे पूर्ण किंवा अंशतः नुकसान झाले असून, २९ जिल्ह्यांतील २५३ तालुक्यांतील २०५९ ग्रामपंचायतींना सरसकट मदत करण्यात येईल. राज्य सरकारने ३२ हजार कोटी रुपयांच्या व्यापक पॅकेजची घोषणा केली आहे. यात थेट ६१७५ कोटी रुपयांची आर्थिक सहाय्य, पीकविम्याखाली किमान ५ हजार कोटी आणि रब्बी हंगामासाठी बियाणे व इतर संसाधनांसाठी ६१७५ कोटींची अतिरिक्त तरतूद आहे. ‘नुकसानाची शतप्रतिमान्य भरपाई शक्य नसली तरी, आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करू.’ असेही फडणवीस म्हणाले.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!