मोठी बातमी! तब्बल 400 किलो RDX ने मुंबई उडवण्याची धमकी देणारा आरोपी अटकेत, नोएडातून ठोकल्या बेड्या…


मुंबई : ऐन अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली होती. मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर धमकीचा मेसेज आला होता. त्यानंतर सतर्क झालेल्या मुंबई पोलिसांनी अखेर आरोपीला नोएडातून अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे.

गणपती विसर्जनाच्या दिवशी मुंबईत बॉम्बस्फोट उडवण्याच्या धमकीने सर्वत्र खळबळ उडाली.मात्र धमकीच्या तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी नोएडा पोलिसांशी संपर्क साधला. नोएडा पोलिसांनी त्वरित कारवाई करत अखेर आरोपीला अटक केली. आरोपीचे नाव अश्विन असल्याचे समोर आले असून तो मूळचा बिहारचा रहिवासी आहे. मागील पाच वर्षापासून तो नोएडामध्ये वास्तव्यास आहे.

मुंबई पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर धमकीचा संदेश पाठवल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली.आरोपीने शहरात अनेक ठिकाणी 34 गाड्यांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता. तब्बल चारशे किलो आरडीएक्स वापरून मोठा हल्ला करण्याची धमकी दिली होती, ज्यामुळे एक कोटी लोकांचा जीव जाईल, असेही म्हटले होते.

सुरुवातीला अटक केलेला अश्विनने स्वतःला ज्योतिषी असल्याचे म्हणवले आहे. परंतु पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मुंबईत गणेशोत्सव अंतिम टप्प्यात असताना ऐन अनंत चतुर्दशीच्या तोंडावर धमकी देण्यात आल्याने गांभीर्य अधिकच वाढले. परंतु सुदैवाने विघ्नहर्त्याने संकट दूर सारत उत्सवाचा शेवट गोड केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!