संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी माहिती आली समोर, जयराम चाटेच्या जवाबात नव्या ‘कराड’ची एन्ट्री..

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटेच्या जवाबात सुग्रीव कराडच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे.
सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून सरपंच संतोष देशमुख आणि गावातील लोकांनी सुदर्शन घुले आणि मित्रांना मारहाण केली होती, अशी माहिती समोर आली आहे. मारहाणीमुळे वाल्मिक अण्णा यांची लोकांमध्ये आणि बीडमध्ये बदनामी झाली.
त्यामुळे सुदर्शन भैय्या याला वाल्मीक अण्णांनी या गोष्टीचा बदला घ्यायला सांगितलं होतं, असं जयराम चाटे याने जवाबात म्हटलं आहे. या हा बदला घेण्यासाठी आज आपण सरपंच संतोष देशमुख यांना उचलून त्याला चांगली अद्दल घडवायचं आहे, असा स्पष्ट उल्लेख जयराम चाटेच्या जवाबात आहे. त्यामुळे सुग्रीव कराड कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सुग्रीव कराड हा केज मधील रहिवासी असून तो गुंड देखील आहे. सुग्रीव कराडने याच्याआधी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याच्यासोबत काम केलं होतं. सुग्रीव कराडने लोकसभा निवडणुकीपर्यंत खासदार बजरंग सोनवणे यांचा विरोध केला होता.
मात्र, निवडणुकीनंतर बजरंग सोनवणे यांचं नेतृत्व मान्य केलंय. सुग्रीव कराडची राजकीय पार्श्वभूमी देखील आहे. सुग्रीव कराड राजकीय पटलावरील असून ते पंचायत समितीला आईला निवडून आणले होते. केज नगरपंचायतीच्या वेळी खासदारांच्या मुलीचा पराभव केला होता.