शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी! बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली मोठी घोषणा…

नवी दिल्ली : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सध्या अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थमंत्री म्हणून आपल्या आठव्या अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारामन यांनी देशातील कोट्यवधी जनतेला मोठी भेट दिली आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

अर्थमंत्र्यांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेची व्याप्ती वाढवली आहे. यासह आता किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे. त्या म्हणाल्या, आपण आर्थिक विकासाकडे वाटचाल करत आहोत. हे बजेट देशाच्या आकांक्षा प्रतिबिंबित करते.
त्यांनी सलग आठव्यांदा सभागृहात अर्थसंकल्प सादर करत आहेत, ज्यामध्ये त्यांनी यापूर्वी सहा पूर्ण आणि दोन अंतरिम अर्थसंकल्प सादर केले आहेत. अर्थमंत्र्यांनी असेही म्हटले की आपण जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहोत. येणाऱ्या काळात आपण अजून मजबूत होणार आहोत.

या योजनेत शेतकऱ्यांना शेती व संबंधित कामांसाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू केलेले एक आर्थिक प्रोडक्ट आहे. या कार्डचा उद्देश शेतकऱ्यांना स्वस्त दरात कर्ज देणे आणि त्यांचे शेतीचे काम सुरळीतपणे चालविण्यासाठी आवश्यक आर्थिक गोष्टी प्रदान करणे आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या योजनेत शेतकरी शेतीव्यतिरिक्त मत्स्यपालन किंवा पशुपालन करणारे लोक देखील या कार्डसाठी अर्ज करू शकतात. याची मर्यादा आधी तीन लाख रुपये होती पण आता सरकारने पाच लाख रुपयांच्या मर्यादेसह नवीन कस्टमाइज्ड क्रेडिट कार्ड जारी करण्याची घोषणा केली आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होईल.
दरम्यान, देशातील किसान क्रेडिट कार्डधारकांची संख्या ७.७५ कोटींवर पोहोचली आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना सुरु केली होती. या कार्डद्वारे शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदराने कर्ज उपलब्ध होते. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.