स्वातंत्र्यदिनी ओबीसी बांधवांना मोठ गिफ्ट; पीएम मोदींनी केली ‘या’ योजनेची घोषणा..

नवी दिल्ली : देशभरात आज 76 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केलं. पंतप्रधानांची ध्वजारोहण करण्याची ही 10 वी वेळ आहे. यावेळी अनेक विषयांनर भाष्य केलं आहे.
तसेच पंतप्रधान मोदी यांनी यावेळी ओबीसी बांधवांसाठी विश्वकर्मा योजना लागू करणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.
पीएम मोदी म्हणाले, ओबीसी बांधवांसाठी विश्वकर्मा योजना लागू होणार आहे. देशातील या योजनांचा फायदा लाखो लोकांना झाला आहे. पारंपारिक कौशल्य असलेल्यांसाठी पुढील महिन्यात सरकार 13,000 ते 15,000 कोटी रुपयांच्या वाटपासह विश्वकर्मा योजना सुरू करेल, अशी घोषणा पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात केली.
या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या वस्तू तयार करणाऱ्यांना आर्थिक साह्य केलं जाणार आहे. प्रशिक्षण, अनुदान आणि तांत्रिक साह्य केलं जाणार आहे. लोहार, सुतार, कुंभार अशा विश्वकर्मांसाठी ही योजना राहणार आहे.
विश्वकर्मा समाजाअंतर्गत १४० जाती येतात. या योजनेच्या घोषणेमुळे २०२४ च्या निवडणुकीत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानसारख्या राज्यात याचा फायदा होण्याची शक्यता आहे.