शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! आता 2 लाखांपर्यंतचे शेती कर्ज मिळणार, जाणून घ्या..

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शेती कर्ज धोरणात मोठा बदल केला आहे. याबाबत त्यांनी ११ जुलै २०२५ पासून लागू होणारा नवा नियम जाहीर केला आहे. यामध्ये आता शेतकरी आता सोने किंवा चांदी गहाण ठेवून बँकेकडून थेट २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवू शकणार आहेत. यामुळे याचा शेतीला फायदा होणार आहे.

यामुळे देशातील लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. यामध्ये अधिकृत बँका शेतकऱ्यांकडून मौल्यवान धातू (सोने/चांदी) गहाण घेऊन शेतीसाठी कर्ज मंजूर करू शकतात. यासाठी शेतकऱ्याची स्पष्ट लेखी संमती आवश्यक आहे. हे कर्ज फक्त शेतीसंबंधित कामासाठीच वापरणे बंधनकारक आहे.
यामुळे आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण कष्टकरी शेतकऱ्यांना कर्ज मिळवणे आता अधिक सुलभ होणार आहे. तसेच तातडीने निधी उपलब्धः खतं, बियाणं, मजुरी, सिंचन यासाठी भांडवलाची तातडीची गरज भासल्यास शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळणार आहे. तसेच कर्ज प्रक्रिया पारदर्शकः सोने-चांदी गहाण असल्याने बँकेसाठीही जोखीम कमी, कर्ज परतफेडीचा विश्वास अधिक.

यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या अधिकृत बँकेत संपर्क साधावा. कर्जासाठी अर्ज करताना आपले सोने-चांदी गहाण ठेवण्याची तयारी दाखवावी. बँक त्यांची संमती घेऊन आणि मूल्यांकन करून २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर करू शकते. आरबीआयचा हा निर्णय ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

यामुळे शेती उत्पादन क्षमता वाढून अधिक नफा मिळवता येईल. निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान, बाजारभावातील चढ-उतार, तसेच उत्पादन खर्चातील वाढ यामुळे शेतकऱ्यांना अनेकदा कर्ज घेणे अपरिहार्य ठरते. अशा वेळी हे कर्ज धोरण शाश्वत आधार देईल. आत्महत्येसारख्या टोकाचा निर्णय रोखता येईल, तसेच शेतकरी समृद्ध होईल.