नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे सेनेला मोठा धक्का! पुण्यात बडा नेता भाजपात प्रवेश करणार….


पुणे : पुणे शहरात शिवसेनेचा एक आक्रमक नेता आणि माजी आमदाराने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंच्या या नेत्यासोबत उबाठाचे ५० कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. यामुळे पुण्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

यामुळे पुण्यात शिवसेना उबाठाला मोठं खिंडार पडणार आहे. याबाबत माहिती अशी की, शिवसेनेचे कार्यरत असलेले आक्रमक नेते सुरज लोखंडे यांनी जाहीर केलेला संदेश हा सगळीकडे पसरला आहे. नवीन वर्ष संपण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांचे पुण्यातले पाच नगरसेवक जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत, असे त्यांनी सांगितले आहे. यामुळे येणाऱ्या काळात घडामोडी घडणार आहेत.

हे नगरसेवक पाच जानेवारीला मुंबई येथे भाजपात जाणार आहेत. ज्यामध्ये विशाल धनवडे, बाळा ओसवाल यांचाही समावेश आहे. त्यांच्यासह ४ नगरसेवक हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजप पक्षात येथे प्रवेश करणार आहेत. यामुळे पुण्यात अडचण निर्माण होणार आहे.

दरम्यान, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून कोणतीही मदत मिळत नासल्यासामुळे नेते आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना उबाठाला जय महाराष्ट्र करत आहेत. मुंबईत ते भाजपमध्ये प्रवेश घेतील. त्यामुळे पुण्यात शिवसेनेला मोठं खिंडार पडणार आहे. या संदर्भातला एक मेसेज शेअर होतो आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यात खासदार संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीनंतर शिवसेनेचा हा मेसेज व्हायरल होत आहे. यामुळे येणाऱ्या काळात काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून आगामी महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!