‘लालपरी’चा स्टार टच! रितेश-जेनेलिया एसटीचे ब्रँड ॲम्बेसिडर; याआधी कोण होते चेहरे?


मुंबई : मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची एसटी महामंडळाच्या ब्रॅण्ड ॲम्बेसिटर म्हणून निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाने आपली प्रतिमा अधिक उजळ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, एसटी महामंडळ आणि देशमुख दाम्पत्य यांच्यात पुढील पाच वर्षांसाठी हा महत्त्वपूर्ण करार करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे लवकरच यासंदर्भातील अधिकृत घोषणा करून करारावर स्वाक्षरी करतील.

या पाच वर्षांच्या कालावधीत रितेश आणि जेनेलिया एसटीच्या विविध व्यावसायिक जाहिराती, प्रवासी जनजागृती मोहिमा आणि महामंडळाच्या सामाजिक उपक्रमांचे प्रमुख चेहरे असतील.

ग्रामीण भागासह शहरी तरुण पिढीला एसटीच्या प्रवासासाठी आकर्षित करणे, हा या निवडीमागचा मुख्य हेतू आहे. ही जोडी केवळ पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय असल्याने, त्यांच्या माध्यमातून एसटीचा प्रचार तळागाळापर्यंत पोहोचवणे सोपे होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, एसटी महामंडळाने यापूर्वीही अनेक दिग्गज मराठी कलाकारांच्या लोकप्रियतेचा उपयोग करून घेतला आहे. याआधी ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे आणि दिवंगत विक्रम गोखले यांनी एसटीचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून जबाबदारी पार पाडली होती. त्यांच्या साध्या आणि प्रभावी संवादशैलीमुळे एसटीला ग्रामीण भागात मोठी पसंती मिळाली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!