रोहित पवार यांना विशेष न्यायालयाचा मोठा दिलासा, शिखर बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणात आरोपमुक्त…


मुंबई : रोहित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणात विशेष न्यायालयाने रोहित पवार यांच्यासह इतरांना आरोपमुक्त केले आहे. या प्रकरणात सुमारे २५ हजार कोटी रुपयांच्या कथित कर्ज घोटाळ्याचा आरोप होता.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता. मात्र, EOW ने सादर केलेला ‘सी-समरी’ (क्लोजर रिपोर्ट) विशेष एसीबी न्यायालयाने २७ फेब्रुवारी रोजी स्वीकारल्याने मूळ गुन्हाच अस्तित्वात राहिला नाही.

त्यामुळे ED चा गुन्हाही कायद्याच्या कसोटीवर टिकत नसल्याचा युक्तिवाद करत रोहित पवार आणि अन्य आरोपींनी आरोपमुक्तीची मागणी केली होती. अखेर विशेष न्यायालयाने ही मागणी मान्य करत सर्वांना दिलासा दिला आहे. दरम्यान, “EOW ने दोन वेळा क्लोजर रिपोर्ट दिल्यानंतरही ED ने मला आरोपी केले. हे राजकीय हेतूने केले गेले,” असा दावा रोहित पवार यांनी यापूर्वी केला होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!