मोठी बातमी ! विहिरीचे छत कोसळून अपघातात 35 जणांचा मृत्यू


 

भोपाळ : इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली. स्नेह नगरजवळील पटेल नगर येथील श्री बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिरात हवनानंतर कन्यापूजन सुरू होते. यादरम्यान विहिरीचे छत पडले आणि तेथे उपस्थित 50 हून अधिक लोक त्यात कोसळले. या अपघातात 35 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी याला दुजोरा दिला आहे. यापूर्वी इंदूरचे जिल्हाधिकारी इलैयाराजा यांनी 35 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. 11 जणांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दोन जखमींचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांना 5 लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

 

दुसरीकडे, अपघाताची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंहही घटनास्थळी पोहोचले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!