सावधान…मुलींनो, ऑनलाईन लग्न जुळवताय! मग एकदा ही बातमी वाचाच…


मुंबई : आपल्या भावी जोडीदाराला शोधण्यासाठी मॅट्रिमोनियल साइट्सची मदत घेत असल्यास मुलींनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. असा इशाराच आता तज्ज्ञांनी दिला आहे.

तसेच आता खोट्या माहितीच्या आधारे भावनिक आणि शारीरिक संबंध ठेवून मुलाकडून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. अशी माहिती स्विफ्ट डिटेक्टिव्ह अँड इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या संचालिका प्रिया काकडे यांनी दिली.

कोरोनानंतर या घटनांमध्ये वाढ झाल्याने मुलींनी ऑनलाईन साइट्सच्या मदतीने जोडीदार शोधताना अलार्म कॉल ओळखा, मुलाची संपूर्ण माहिती घेण्यासाठी गुप्तहेरांची मदत घ्या, असे आवाहन स्विफ्ट डिटेक्टिव्ह एण्ड इन्व्हेस्टिकेशन एजन्सी या प्रसिद्ध खासगी गुप्तहेर संस्थेच्या संचालिका प्रिया काकडे यांनी केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ऑनलाईन गुन्हेगारीतून मुलींच्या होणा-या फसवणूकीबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत प्रिया काकडे यांनी सर्वांसमोर सद्यस्थितीत ऑनलाईन फसवणूकीतील भयावह सत्य सांगितले आहे.

‘मी गेली २० वर्ष या गुप्तहेर क्षेत्रात कार्यरत आहे. आम्ही घटस्फोट, विवाहबाह्य संबंध, खासगी तपास, आर्थिक फसवणूकीची प्रकरणे हाताळतो. आतापर्यंत तब्बल १ हजार ६० केसेसमध्ये पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या संस्थेने मदत केली आहे. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत कोरोनानंतरच्या केसेस हाताळताना एक विशिष्ट पॅटर्न मला प्रकर्षाने जाणवले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ऑनलाईन गुन्हेगारीतून मुलींच्या होणा-या फसवणूकीबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत प्रिया काकडे यांनी सर्वांसमोर सद्यस्थितीत ऑनलाईन फसवणूकीतील भयावह सत्य सांगितले. ‘‘मी गेली २० वर्ष या गुप्तहेर क्षेत्रात कार्यरत आहे. आम्ही घटस्फोट, विवाहबाह्य संबंध, खासगी तपास, आर्थिक फसवणूकीची प्रकरणे हाताळतो.

आतापर्यंत तब्बल १ हजार ६० केसेसमध्ये पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या संस्थेने मदत केली आहे. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत कोरोनानंतरच्या केसेस हाताळताना एक विशिष्ट पॅटर्न मला प्रकर्षाने जाणवले. कोरोनानंतर घरगुती हिंसाचारात वाढ होत असल्याने अनेकांचे घटस्फोट झाले.

तीन-चार वर्षांचा काळ सरल्यानंतर आता महिला लग्नाचा पुनर्विचार करु लागल्या आहेत. या महिलांना मेट्रीमॉनियल साइट्सवरुन ओळख होणा-या जोडीदाराकडून आर्थिक फसवणूक होत आहे. कोरोनानंतर घरगुती हिंसाचारात वाढ होत असल्याने अनेकांचे घटस्फोट झाले. तीन-चार वर्षांचा काळ सरल्यानंतर आता महिला लग्नाचा पुनर्विचार करु लागल्या आहेत. या महिलांना मेट्रीमॉनियल साइट्सवरुन ओळख होणा-या जोडीदाराकडून आर्थिक फसवणूक होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!