जरांगेंच्या आंदोलनामागे अजितदादा, लक्ष्मण हाकेंचा थेट अजित पवारांवर हल्ला, उडाली खळबळ…


मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची हाक दिली आहे. याच मागणीसाठी मनोज जरांगेंनी थेट मुंबई गाठत आंदोलन सुरु केले आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा बांधवांचं आरक्षणाच्या मागणीसाठी भगवं वादळ धडकलं आहे.

आता या आंदोलनावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे. “हा लढा आरक्षणासाठी नसून सरकार उलथून टाकण्याचा राजकीय कट आहे,” असा आरोप करत त्यांनी थेट अजित पवार गटालाही या कटात सहभागी असल्याचं म्हटलं आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, आतापर्यंत मी फक्त विरोधी पक्ष सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत असं म्हणत होतो. पण आता मी जबाबदारीने सांगतो की अजित पवारांचे आमदार आणि खासदार देखील या कटात सामील आहेत. जरांगे नावाच्या चेहऱ्यामागून आमदार-खासदार सरकारला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा लढा आरक्षणाचा नाही.

हाके पुढे म्हणाले की, जर जरांगेंच्या मागण्या पूर्ण झाल्या तर राज्यातील ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात येईल. महाराष्ट्रात लोकशाही कोमात असून झुंडशाही वाढत आहे. जरांगे न्यायालयाचे आदेश मानायला तयार नाहीत, मग ते हुकूमशाहा आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मनोज जरांगे मुंबईकडे निघताना स्वतः म्हणाले होते की मी सरकार उलथून लावणार आहे. त्यांनीच ती स्क्रिप्ट फोडली. मग हा लढा आरक्षणासाठी नाही हे स्पष्ट आहे,” असं हाके म्हणाले. त्यांनी भावनिक होत मी चुकीचा असेल तर मला आतमध्ये टाका. मी आत्महत्या करू का म्हणजे प्रश्न सुटतील का? असेही विधान केले.

हाके यांनी अजित पवारांवरही निशाणा साधत म्हटलं की, अजित पवारांचे आमदार जरांगे यांच्या आंदोलनाला रसद पुरवत आहेत. अजित पवार हे मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच ओबीसी मंत्र्यांनी मुख्यमंत्री भेटून भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा ओबीसी समाज त्यांना माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!