Baramati Lok Sabha : बारामती लोकसभेच्या ईव्हीएम मशीनच्या स्ट्रॉंग रुमच्या सीसीटीव्ही यंत्रणा बंद! सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिनीधीची तक्रार..!!

Baramati Lok Sabha पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या स्ट्रॉंगरुम मध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनच्या सीसीटीव्ही फुटेज ४५ मिनिटे बंद झाल्याने या प्रकारावरुन शरद पवार गटाने आरोपांना सुरुवात केली आहे.
बारामतीमधील सर्व मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन्स या एका गोदामातील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आल्या होत्या. ईव्हीएम मशीन्स असलेल्या या स्ट्राँग रुमवर सीसीटीव्ही फुटेज अचानक बंद झाल्याची घटना घडल्याचा आरोप शरद पवार गटाने केला आहे. Baramati Lok Sabha
माहितीनुसार, सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी या प्रकरणी आक्षेप घेतला आहे. याबाबत त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.
Views:
[jp_post_view]