Baramati Lok Sabha : शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर प्रश्न विचारताच सून सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू, नेमकं काय झालं?


Baramati Lok Sabha : बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद आणि भावजय यांच्यात लढत होणार आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बारामतीत काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी, जिथे पवार आडनाव असेल तिथे मतदान करायचं, म्हणजेच पवार आडनाव पाहून मतदान करा, अशा आशयाचे वक्तव्य केले होते. यावर कोणाला वाईट वाटले नव्हते, मात्र शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा आता अजित पवार गटाकडून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

शरद पवारांच्या वक्तव्याबाबत आज पत्रकारांनी सुनेत्रा पवार यांना विचारले असता सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रु आले. त्यांनी प्रतिक्रिया देणेही टाळले. अजित पवारांच्या विधानावर शरद पवारांनी बाहेरुन आलेले पवार आणि मूळ पवार, या दोन गोष्टी असतात, अशी प्रतिक्रिया दिली. तुम्हाला यावर काय बोलायचं आहे, असं सुनेत्रा पवार यांना विचारण्यात आले. यावर सुनेत्रा पवार यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. तसेच यावेळी हे ऐकून त्यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. Baramati Lok Sabha

अजित पवार यांनी म्हटले होते की, तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या मागे उभे राहिलात. नेहमी पवारांच्या लेकीला निवडून दिले. यावेळी सुनेला निवडून द्या. जिथे पवार आडनाव असेल तिथे मतदान करायचे, थोडक्यात अजित पवार यांनी सुळे आडनावाला नव्हे तर पवार आडनाव पाहून मतदान करा, असेच अप्रत्यक्षपणे सांगितले होते. अजित पवारांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना शरद पवार यांनी म्हटले की, बारामतीकरांनी पवारांच्या पाठिशी उभं राहायला हवे.

यात चूक काय आहे? दोन गोष्टी असतात, एक मूळ पवार आणि दुसरे बाहेरून आलेले पवार. खरं पाहता सुन ही बाहेरच्या घरातूनच आपल्या घरात आलेली असते, हे नाकारता येणार नाही. सुप्रिया सुळे पूर्वी पवार होत्या.

त्या विवाहानंतर सुळे झाल्या तसेच सुनेत्रा पवारांच्या बाबतीतही झाले आहे. यामध्ये शरद पवारांनी वेगळे काहीही म्हटले नव्हते, अथवा महिलांना वाईट वाटण्यासारखे ते काहीही बोलले नव्हते, पण अजित पवार गट या मुद्द्याचे राजकारण करत असल्याचे दिसत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!