मोठी बातमी ! बच्चू कडू यांची साथ त्यांचा सहकारी सोडणार , कोणी केला दावा..!!

Politics : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी अमरावती मतदारसंघावर दावा केला आहे. अमरावतीतून प्रहारचा नेता निवडणूक लढवेल असं आज सकाळी मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना बच्चू कडू वक्तव्य यांनी केल आहे. त्यानंतर आता प्रहारचा बडा नेता बच्चू कडू यांची साथ सोडणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
प्रहारचे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल बच्चू कडूंची साथ सोडणार का?, अशी चर्चा सध्या होत आहे. आमदार रवी राणा यांनी तसा दावा केला आहे. शिवाय हा बडा नेता शिवसेना किंवा भाजपसोबत जाऊ शकतो, असंही रवी राणा म्हणाले आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा होत आहे. राजकुमार पटेल यांची स्वतः ची मतदारसंघात पकड आहे. वैयक्तिक त्यांची पकड चांगली असल्याने ते आमदार झाले,असे ते म्हणाले आहेत.
दरम्यान, पुढे बोलताना राणा म्हणाले, राजकुमार पटेल आता वेगळ्या वाटेवर आहेत. हे त्यांनाही माहित आहे आणि मलाही माहित आहे, भाजपचे तिकीट मिळाले पाहिजे हे राजकुमार पटेल यांना वाटते असा दावा रवी राणा यांनी केला आहे