Ayodhya Ram Mandir : राम मंदिर २६ जानेवारीपासून सर्वसामान्य लोकांसाठी होणार खुले! अयोध्येत जंगी तयारी सुरू…

Ayodhya Ram Mandir नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशभरातील साधू-संतांच्या उपस्थितीत २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Ayodhya Ram Mandir
नंतर सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी २६ जानेवारीपासून मंदिर खुले होणार आहे. अनेकजण याबाबत वाट पाहत होते. अखेर याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी याबाबत माहिती दिली आहे. Ayodhya Ram Mandir
ते म्हणाले की, २२ जानेवारीला उद्घाटन झाल्यानंतर 26 जानेवारीपासून मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे. पण त्याआधी २२ जानेवारीच्या कार्यक्रमासाठी ज्यांना निमंत्रण देण्यात आले आहे, त्यांना दर्शनाची संधी मिळणार आहे.
राज्यनिहाय या निमंत्रितांना फोन करून त्यांच्या दर्शनाच्या वेळा कळवण्यात येतील. २६ जानेवारीपासून दर्शन घेणार्यांना आधी नोंदणीकरून ऑनलाईन तिकिटे घ्यावी लागणार आहेत.
मंदिराचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत कामाची पाहणी सुरू आहे. अनेकांनी यासाठी देणगी देखील दिली आहे. हे एक भव्य दिव्य मंदिर असणार आहे.