अजितदादांच्या घरी मंगलकार्य!! जय पवारांचे ठरलं लग्न, शरद पवारांना भेटून घेतले आशीर्वाद….

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केले. त्यामुळे सर्वाचं लक्ष वेधलं गेलं आहे. यामध्ये त्यांनी जय पवार यांचे अभिनंदन केले आहे.
सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेल्या फोटोत शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह जय पवार हे दिसत आहेत. पवार कुटुंबीयांसोबत जय पवार असून त्यांच्यासोबत एक तरुणीही दिसत आहे. यामुळे अजित पवार यांच्या घरात लवकरच मंगलकार्य होणार असल्याचे सांगितले जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे द्वितीय चिरंजीव यांचं लग्न ठरलं असून त्यांचा साखरपुडा 10 एप्रिलला पुण्यात होणार आहे. यावेळी बडे नेते उपस्थित राहणार आहेत. सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत हा साखरपुडा पार पडणार आहे
या साखरपुड्यापूर्वी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी आजोबा शरद पवार यांची पुणे येथील घरी जाऊन भेट घेतली. याचे फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी सगळीकडे शेअर केले आहेत. यामुळे जय पवार यांचे अभिनंदन केले जात आहे.