बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले! चेअरमनपदाची धुरा हातात घेताच पृथ्वीराज जाचक यांनी करून दाखवलं! 1 कोटींची ठेव ठेवली अन् कामगारांचा पगार केला….

भवानीनगर : श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगरच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत पृथ्वीराज बापू जाचक यांचे पॅनेल विक्रमी मतांनी सभासदांनी निवडून दिले. यानंतर छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी पृथ्वीराज (बापू) जाचक यांची निवड करण्यात आली. त्यानंतर कारखान्यातील कामगारांनी कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती निमित्त नूतन संचालक मंडळ व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.

याच सत्कारादरम्यान कामगारांनी त्यांचे ग्रॅच्युइटी व पगाराबाबत बापूंजवळ खंत व्यक्ती केली होती, त्यावर पृथ्वीराज बापूंनी तुम्ही मला कारखाना उत्कर्षासाठी साथ द्या मी तुमचा पगाराची 7 तारीख ओलांडू देणार नाही हा शब्द दिला. आणि आश्चर्याची बाब म्हणजे मे महिना उलटून गेल्यानंतर खरेच 7 जूनच्या आत 6 जूनलाच बापूंनी कामगारांचा पगार त्यांच्या खात्यावर वर्ग केला.
बापूंच्या या कृतीने सर्व कामगार वर्ग आश्चर्यचकित झाला व त्यांनी बापू व संचालक मंडळाला मनोमन धन्यवाद देऊन आभार मानले. खरंतर कारखाना आर्थिक अडचणीत असताना कारखान्याकडे पैसे नसताना बापूंनी त्यांचे स्वतः जवळील 1 कोटी रुपयांची ठेव कारखान्यामध्ये अनामत ठेवून कामगारांचा पगार केला व ते दिल्या शब्दाला जागले.

इंदापूर व बारामती तालुक्यातील 53 गावच्या लोकांचा प्रपंच ज्यावर अवलंबून आहे, असा श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यांमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय मामा भरणे व साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज बापू जाचक यांच्यात मनोमीलन होऊन सभासद व कामगारांमध्ये कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याबाबत एक नवीन आशा निर्माण झाली आहे.

दरम्यान, सध्या कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पृथ्वीराज जाचक रोज कारखान्यात बसून आहेत सध्या ऊसतोड मजुरांचे करार करण्याची प्रक्रिया सुरू आहे सर्व गोष्टीत मार्ग काढून आपला कारखाना बाहेर काढूया, असे जाचक बापू यांनी म्हटले आहे.