पंढरपूर विठ्ठल दर्शनासाठी जाताय? आषाढ महिन्यात ‘हा’ नवा नियम लागू; जाण्याआधी वाचा…


पंढरपूर : पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो वारकरी मोठ्या संख्येने दाखल होत असतात. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य भाविकांना जलद आणि सुलभ दर्शन मिळावे यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सोलापूर जिल्हा प्रशासनाने माहिती दिली आहे की, आषाढ महिन्याभर विठ्ठल मंदिरातील व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. गर्दीच्या काळात सामान्य भक्तांना प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरवर्षी आषाढी वारीदरम्यान पंढरपूर येथे सुमारे 15 लाखांहून अधिक वारकरी दर्शनासाठी येतात. यामुळे दर्शन रांग अनेक किलोमीटरपर्यंत पोहोचते आणि भाविकांना अनेक तास प्रतीक्षा करावी लागते. ही अडचण कमी करण्यासाठी व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याबाबत माहिती दिली असून, आषाढ महिन्यात केवळ वारकरी भाविकांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. राजकीय नेते, अधिकारी, उद्योगपती किंवा इतर व्हीआयपींसाठी विशेष दर्शन सुविधा उपलब्ध राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्या पुरुषोत्तम अधिकमास सुरू असल्यानेही पंढरपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या काळातही व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले असून, आषाढ महिन्यातही हीच व्यवस्था कायम राहणार आहे. या निर्णयामुळे दर्शन व्यवस्था अधिक सुरळीत होईल आणि सामान्य वारकऱ्यांना कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन घेता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!