घरात खूप डास झालेत? डासांचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे ‘ही’ 3 झाडं, एकदा घराजवळ लावली डासांची कायमची कटकट मिटेल…

पुणे: सध्या उन्हाळा सुरू असून अनेक ठिकाणी लाईट देखील जात आहे. अशावेळी डास देखील अनेक ठिकाणी त्रासदायक ठरतात. अनेकजण डासांपासून बचावासाठी महागडे उपाय करतात, मात्र त्याचा परिणाम काही वेळापुरताच दिसतो. डासांमुळे आरोग्य देखील डोक्यात येऊ शकतं.

अशावेळी घरात काही खास झाडं लावणं हा डासांवर प्रभावी उपाय ठरू शकतो. यामुळे याबाबत माहिती असणे गरजेचे आहे. डासांमुळे झोपमोड तर होतेच पण डेंग्यू आणि मलेरियासारख्या गंभीर आजारांचाही धोका वाढतो. यामध्ये झेंडूच्या फुलांचा सुगंध डासांना सहन होत नाही.
त्यामुळे बाल्कनी, खिडकी किंवा घराच्या प्रवेशद्वाराजवळ झेंडूची रोपं लावल्यास डासांचा त्रास कमी होण्यास मदत होते. यामुळे हा उपाय देखील फायदेशीर आहे. पुदिन्याचा तीव्र सुगंध डासांना दूर ठेवण्यास मदत करतो. घरात पुदिन्याचं रोप लावू शकता. हा घरगुती उपाय आहे.

तसेच पुदिन्याच्या पानांची पेस्ट करून ती खिडकीजवळ ठेवल्यासही डास दूर राहतात. तसेच तुळशीचा सुगंध डासांना अजिबात आवडत नाही. घराच्या दारात किंवा खिडकीजवळ तुळशीचं रोप ठेवल्यास डास घरात येण्याचं प्रमाण कमी होतं. यामुळे हे उपाय फायदेशीर आहेत.

यासोबतच तुळस घरात सकारात्मक वातावरणही निर्माण करते. यामुळे हे उपाय एकदा करून बघितल्यास याचा नक्कीच फायदा होईल. याबाबत अनेकदा डास चावल्याने अनेकजण आजारी पडून अनेकांचे प्राण देखील गेल्याचे समोर आले आहे. यामुळे याबाबत माहिती असणे गरजेचे आहे.